महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

बॉयफ्रेंडच्या वाढदिवशी अंकिताने शेअर केली रोमॅन्टिक पोस्ट, आईलाही दिल्या शुभेच्छा - मणिकर्णिका - द क्विन ऑफ झांशी

अंकिता तिच्या लव्हलाईफमुळे चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वीच विकी जैनने तिला प्रपोज केले. त्यानंतर दोघांच्याही नात्याच्या चर्चा सुरू झाल्या. दोघांचे फोटो देखील सोशल मीडियावर पाहायला मिळतात.

अंकिताने शेअर केली रोमॅन्टिक पोस्ट, आईलाही दिल्या शुभेच्छा

By

Published : Aug 2, 2019, 8:00 PM IST

मुंबई - छोट्या पडद्यावरून घराघरात पोहोचलेल्या अंकिता लोखंडेने काही दिवसांपूर्वीच तिच्या नव्या नात्याचा खुलासा केला आहे. उद्योगपती असलेला विकी जैनसोबत ती काही महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त तिने सोशल मीडियावर रोमॅन्टिक पोस्ट शेअर केली आहे.

विकी जैनसोबतच अंकिताच्या आईचाही वाढदिवस आहे. तिने तिच्या आईसाठी देखील एक पोस्ट शेअर केली आहे. 'माझ्या आयुष्यातल्या दोन महत्वाच्या व्यक्तींचा आज वाढदिवस असल्याने मी फार आनंदी आहे, असे तिने तिच्या पोस्टमध्ये म्हटले आहे'.

अंकिताने 'पवित्र रिश्ता' या मालिकेत अर्चनाची भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे ती प्रचंड लोकप्रिय झाली. त्यानंतर तिला मोठ्या पडद्यावरही भूमिका साकारण्याची संधी मिळाली. तिने कंगना रनौतसोबत 'मणिकर्णिका - द क्विन ऑफ झांशी' या चित्रपटात झलकारी बाईचे पात्र साकारले होते. तिच्या या भूमिकेचेही कौतुक झाले.

सध्या ती तिच्या लव्हलाईफमुळे चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वीच विकी जैनने तिला प्रपोज केले. त्यानंतर दोघांच्याही नात्याच्या चर्चा सुरू झाल्या. दोघांचे फोटो देखील सोशल मीडियावर पाहायला मिळतात.

ABOUT THE AUTHOR

...view details