मुंबई - सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी बिहार पोलीस मुंबईत आले आहेत. अंकिता लोखंडेचा जबाब नोंदवण्यासाठी गेलेल्या या पोलीस पथकाला परतण्यासाठी अंकिताने आपली गाडी देऊ केली. तिच्या जग्वार या लग्झरी गाडीतून चार जणांची पोलीस टीम आपल्या पुढील कामासाठी रवाना झाली.
बिहार पोलीस पथकाला अंकिता लोखंडेच्या घरी चौकशीसाठी जायचे होते. मालाडमध्ये तिच्या घरापासून हे पोलीस तीन किलोमिटर दूर होते. सध्या सुरू असलेल्या कोरोना साथीमुळे सर्वत्र शुकशुकाट होता. वाहने मिळत नव्हती. टॅक्सी आणि ऑटोरिक्षा उपलब्ध नव्हत्या. विशेष म्हणजे बिहार पोलिसांच्या टीमला मुंबई पोलिसांनी कोणत्याही वाहनाची मदत केलेली नाही.
अंकिताच्या घरी जाण्यासाठी बिहार पोलिसांच्या या पथकाला तीन किलोमीटर चालत जावे लागले, असे या अहवालात म्हटले आहे. ही चौकशी सुमारे एक तास चालली, त्यानंतर त्यांना लांबपर्यंत चालत जावे लागू नये यासाठी अंकिताने पोलिसांसाठी आपल्या जग्वार गाडीची ऑफर दिली.
अंकितासाठी पोलिसांच्या पथकात जवळपास 30 प्रश्न असल्याचे सूत्रांनी सांगितले. तिने जे सांगितले त्यासंबंधीचा तपशील अद्याप समोर आला नाही.