मुंबई - अभिनेता अनिल कपूरने आपल्या चाहत्यांमधील उत्सह वाढवण्यासाठी मलंग चित्रपटातील आकर्षक लूक असलेले पोस्टर रिलीज केले आहे. त्याचा हा लूक उत्तेजित करणारा आहे.
अनिल कपूर यांनी इन्स्टाग्रामवर पोस्टर शेअर केले आहे. मलंग चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांनी भरपूर पसंत केले आहे.
मोहीत सुरीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. अनिल कपूर आणि कुणाल खेमू यांच्याही महत्वपूर्ण भूमिका यामध्ये आहेत. ७ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
'मलंग' या चित्रपटात अनिल कपूर यांच्यासोबत आदित्य रॉय कपूर, दिशा पटानी, आणि कुणाल खेमू यांच्या प्रमुख भूमिका आहेत. भूषण कपूर, लव रंजन, अंकुर गर्ग आणि जय शेवाकरमानी या चौघा निर्मात्यांनी मिळून याची निर्मिती केलीय. मोहित सुरी याचे दिग्दर्शन करणार आहेत.'आशिकी २' या चित्रपटाच्या निर्मितीनंतर मोहित सुरी सहा वर्षानंतर भूषण कुमार यांच्यासोबत काम करीत आहेत.