मुंबई- १९८७ मध्ये आलेल्या 'मिस्टर इंडिया' चित्रपटासाठी सोबत काम केलेले चित्रपट निर्माता शेखर कपूर आणि अभिनेता अनिल कपूर पुन्हा एकदा एका नव्या प्रोजेक्टसाठी एकत्र काम करताना दिसणार आहेत. विशेष म्हणजे हा प्रोजेक्ट मिस्टर इंडिया चित्रपटाचा सिक्वलही असू शकतो.
'मिस्टर इंडिया'चा सिक्वल येणार, अनिल कपूरनं दिले संकेत - mister india
मिस्टर इंडियाचे निर्माते शेखर कपूर यांनी नुकतीच अनिल कपूर यांची भेट घेतली असून या भेटीचा फोटो त्यांनी आपल्या ट्विटरवरून शेअर केला आहे. या फोटोला त्यांनी कॅप्शनही दिले आहे.
होय, निर्माता शेखर कपूर यांनी स्वतःच याबद्दल माहिती दिली आहे. शेखर यांनी नुकतीच अनिल कपूर यांची भेट घेतली असून या भेटीचा फोटो त्यांनी आपल्या ट्विटरवरून शेअर केला आहे. या फोटोला त्यांनी कॅप्शनही दिले आहे. 'मिस्टर इंडिया २' किंवा दुसऱ्या एखाद्या चित्रपटासाठी एकत्र काम करण्याबद्दल चर्चा करत आहोत, असं त्यांनी आपल्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.
तर अनिल कपूरनंही हा फोटो शेअर करत शेखर कपूर आणि मी काहीतरी नवीन करण्याचा विचार करत आहोत, ज्यासाठी सध्या आम्ही चर्चा करत आहोत. आम्ही तशीच जादू करण्याचा प्रयत्न करत आहोत, जशी 'मिस्टर इंडिया'मधून केली होती, असे अनिल यांनी म्हटले आहे. त्यांच्या या कॅप्शनवरून मिस्टर इंडिया चित्रपटाचा सिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.