महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'मलंग'साठी अनिल कपूरची जोरदार तयारी सुरू - Mohit Suri

अनिल कपूर यांनी मलंग चित्रपटाची पूर्वतयारी जोरदार सुरू केली आहे. मोहित सूरी दिग्दर्शन करीत असलेल्या या चित्रपटात आदित्य रॉय कपूर, दिशा पटानी, आणि कुणाल खेमू यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

अनिल कपूर, फोटो इन्स्टाग्रामच्या सौजन्याने

By

Published : Jun 10, 2019, 11:01 PM IST

मुंबई - अनिल कपूर यांनी 'मलंग' या आगामी चित्रपटाची तयारी सुरू केली आहे. नवी व्यक्तीरेखा साकारण्यासाठी अनिल यांनी अपार कष्ट घ्यायला सुरूवात केली आहे.

अनिल कपूर यांनी एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यात ते पार्कमध्ये धावत असताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये पार्कमधील लोक त्यांना प्रत्साहन देताना दिसत आहे.

या तयारीबद्दल अनिल यांनी लिहिलंय, '' 'मलंग' चित्रपटाची तयारी सुरू झाली आहे. ही एक नवी सुरुवात आहे.'' या चित्रपटासाठी तंदुरुस्त राहण्यासाठी कडक मेहनत अनिल घेत आहेत.

अनिल कपूर यांच्या मुली सोनम आणि रेहा कपूर यांनी वडिलांना प्रोत्साहन देणाऱ्या कॉमेंट्स केल्या आहेत.

'मलंग' या चित्रपटात अनिल कपूर यांच्यासोबत आदित्य रॉय कपूर, दिशा पटानी, आणि कुणाल खेमू यांच्या प्रमुख भूमिका आहेत. भूषण कपूर, लव रंजन, अंकुर गर्ग आणि जय शेवाकरमानी या चौघा निर्मात्यांनी मिळून याची निर्मिती केलीय. मोहित सुरी याचे दिग्दर्शन करणार आहेत.

'आशिकी २' या चित्रपटाच्या निर्मितीनंतर मोहित सुरी सहा वर्षानंतर भूषण कुमार यांच्यासोबत काम करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details