मुंबई -कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून नागरिक योग्य ती खबरदारी घेताना दिसत आहेत. तसेच कलाकार देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना गर्दी टाळण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. अभिनेते अनिल कपूर आणि अनुपम खेर यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दोघांनीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकमेकांशी दुरूनच संवाद साधला आहे.
अनुपम खेर यांनी आपल्या बाल्कनीमधूनच अनिल यांच्याशी मोबाईलवर संवाद साधला. ते अलिकडेच विदेशातून भारतात परतले आहेत. त्यामुळे अनिल कपूर यांच्याशी बोलताना ते म्हणतात, की तू माझ्या समोर आहेस तरीही आपण एकमेकांना भेटू शकत नाही. एकमेकांच्या घरी जाऊ शकत नाही'.
हेही वाचा -कोरोनामुळे घाबरुन जाऊ नका, रोहित शेट्टीचे नागरिकांना आवाहन