महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

अनिल कपूरला कोरोनाची लागण नाही, ट्विट करुन स्वतःच दिला दुजोरा - Anil Kapoor also infection of corona

'जुग जुग जियो' या चित्रपटातील वरुण धवन, नीतू कपूर यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. या चित्रपटात काम करणाऱ्या अनिल कपूर यांनाही कोरोनाची लागण झाली असल्याची चर्चा होती. मात्र त्यानेच ट्विट करुन या बातमीला खोटे ठरवत आपल्याला कोरोना झाला नसल्याचे म्हटले आहे.

Anil Kapoor
अनिल कपूर

By

Published : Dec 4, 2020, 10:24 PM IST

Updated : Dec 5, 2020, 2:39 PM IST

मुंबई - अभिनेता अनिल कपूरने त्याच्या बाबतीत सुरू असलेल्या चर्चेला पूर्ण विराम दिला असून आपल्याला कोरोनाची लागण झाला नसल्याचा खुलासा त्याने केला आहे. अनिल कपूरने आपल्या ट्विटरवर लिहिलंय, कोणत्याही अफवा पसरू नयेत म्हणून सांगतो की, माझी कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. तुम्ही करीत असलेल्या काळजीबद्दल आणि शुभेच्छांबद्दल आपला आभारी आहे.

अनिल कपूर यांचे ट्विट

हेही वाचा -वरुण धवन, नीतू कपूर, दिग्दर्शक राज मेहता यांना कोरोनाबाधा

अनिल कपूरसोबत 'जुग जुग जियो' या राज मेहता दिग्दर्शित चित्रपटाचे शूटिंग करणारे वरुण धवन आणि नीतू कपूर कोविड पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. मात्र अनिल कपूर यांच्या टेस्टबाबत स्पष्टता नव्हती. मात्र त्यांनी आपण निगेटिव्ह झाल्याचे सांगितल्यानंतर आता या चर्चेला विराम मिळाला आहे.

'जुग जुग जियो' या चित्रपटाचे शूटिंग थांबविण्यात आले आहे.

हेही वाचा -अक्षय कुमार 'रामसेतु'चे आयोध्येत करणार शुटिंग

Last Updated : Dec 5, 2020, 2:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details