मुंबई - अभिनेत्री राधिका मदन आगामी 'अंग्रेजी मेडियम'मंधील 'नाचा नू जी करदा' गाण्यावर मनमोकळेपणाने थिरकली आहे. निर्मात्यांनी आज हे गाणे रिलीज केले.
गाण्याची सुरूवात स्कूलमधून होते. राधिकाच्या भोवती मुली अभ्यास करीत आहेत आणि अचानक राधिका डान्स करायला सुरूवात करते.
गाण्यामध्ये राधिकाने बॉलिवूडच्या शाहरुख खान, सलमान खान, ऋतिक रोशन आणि रणवीर सिंह सारख्या कलाकारांच्या डान्स स्टेप केल्या आहेत.
'नाचा नू जी करदा' हे गाणे चनिष्क बागचीने संगीतबध्द केलंय. रोमी आणि निकीता गांधी यांनी गाण्याला स्वरसाज चढवलाय. हे मुळ गाणे ए एस बर्मी आणि के एस बर्मी यांनी रचलेले आहे.
'अंग्रेजी मेडियम' चित्रपटाचा काही दिवसापूर्वी ट्रेलर आला होता. लोकांच्या खूप पसंतीला हा ट्रेलर उतरला असून चित्रपटाच्या रिलीजची प्रतीक्षा सुरू आहे. दोन वर्षानंतर इरफान खान या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर परतणार असल्यामुळे प्रेक्षक आतुर झाले आहेत.
'अंग्रेजी मेडियम' हा चित्रपट १३ मार्चला रिलीज होणार आहे.