महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'अंग्रेजी मीडियम'चे नवे गाणे 'लाडकी' रिलीज, हृदयाला स्पर्श करणारे बोल - नवे गाणे 'लाडकी' रिलीज झाले

इरफान खानच्या आगामी 'अंग्रेजी मीडियम' चित्रपटातील नवे गाणे 'लाडकी' रिलीज झाले आहे. रेखा भारद्वाज यांनी गायलेले ही गाणे ह्रदयाला स्पर्श करणारे आहे.

Angrezi medium new song out now
'अंग्रेजी मेडियम'चे नवे गाणे 'लाडकी'

By

Published : Mar 11, 2020, 3:19 PM IST

Updated : Mar 11, 2020, 4:19 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता इरफान खान यांची खूप काळापासून चाहते प्रतीक्षा करीत आहेत. आगामी 'अंग्रेजी मीडियम' चित्रपटातून ते रुपेरी पडद्यावर कमबॅक करीत आहेत.

'अंग्रेजी मीडियम' चित्रपटाचे नवे गाणे आता प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. या गाण्यात करिना कपूर खान, इरफान खान, राधिका मदन, डिंपल कपाड़िया आणि दीपक डोबरियाल असे दिग्गज कलाकार झळकले आहेत. या गाम्याचे शीर्षक 'लाडकी' असे आहे. रेखा भारद्वाज यांच्या आवाजातील हे गाणे सचिन-जिगर यांनी संगीतबध्द केले आहे.

या गाण्यात सर्व कलाकार उधास दिसत आहे. करिना बंद खोलीमध्ये जुन्या आठवणींना उजाळा देत आहे. तर इरफान खान आपल्या राधिकाचे लहानपणीपासूनच्या प्रवासाच्या आठवणीत रमला आहे.

मुलीचे इंग्रजी शिकण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आयुष्य पणाला लावणारा बाप इरफानने या चित्रपटात साकारला आहे. अत्यंत वास्तववादी चित्रण यात पाहायला मिळते. खुसखुशीत संवाद, मिश्किल विनोद आणि खिळवून ठेवणारे कथानक अंग्रेजी मीडियममध्ये असल्याचे ट्रेलरवरुन स्पष्ट जाणवते.

करिना कपूर या चित्रपटात पोलिसाची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात डिंपल कपाडिया यांची देखील महत्त्वाची भूमिका पाहायला मिळणार आहे. २०१७ मध्ये आलेल्या 'हिंदी मीडियम' या चित्रपटाचा 'अंग्रेजी मीडियम' हा सीक्वल आहे. दिनेश विजान यांची ही निर्मिती आहे. आता 'अंग्रेजी मीडियम' हा चित्रपट १३ मार्च २०२० रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

Last Updated : Mar 11, 2020, 4:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details