मुंबई - इरफान खानच्या बहुप्रतीक्षित 'अंग्रेजी मेडियम' या चित्रपटाचे पहिले पोस्टर आणि प्रमोशनल व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आलाय. इरफान यांच्या आवाजातील हा व्हिडिओ ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी शेअर करीत उद्या ट्रेलर लॉन्च होणार असल्याची बातमी दिली आहे.
या पहिल्या पोस्टरमध्ये इरफान खान क्विनच्या रॉयल गार्डच्या गेटअपमध्ये दिसत असून राधिका मेनन पोस्टरमध्ये दिसत आहे.
रॉयल गार्डच्या वेशभूषेतील इरफान खान पोस्टरमध्ये अत्यंत हसमुख दिसत आहेत. बराच काळ दुर्धर आजाराशी झुंजल्यानंतर इरफान काही महिन्यापूर्वी भारतात परतले होते. 'अंग्रेजी मेडियम' हा त्यांचा बहुप्रतीक्षित चित्रपट आहे. त्यांचे चाहते रुपेरी पडद्यावर त्यांना पाहायला उत्सुक आहेत.
करिना कपूर या चित्रपटात पोलिसाची भूमिका साकारत आहे. तर राधिका इरफान यांच्या मुलीची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात डिंपल कपाडिया यांची महत्त्वाची भूमिका आहे.'हिंदी मेडियम' या २०१७ मध्ये आलेल्या चित्रपटाचा 'अंग्रेजी मेडियम' सीक्वल आहे. दिनेश विजान यांची ही निर्मिती आहे