मुंबई- अभिनेत्री अंगिरा धर अमिताभ बच्चन, अजय देवगन आणि रकुल प्रीत सारख्या कलाकारांसह आगामी 'मेडे' या थ्रीलर चित्रपटाच्या कास्टमध्ये सामील झाली आहे. चित्रपटात अंगिरा एक वकील म्हणून दिसणार आहे. अंगिरा यापूर्वी 'कमांडो 3' मध्ये दिसली होती.
या बद्दल बोलताना अंगिरा म्हणाली, "अमिताभ सर आणि अजय सरांसारख्या आमच्या चित्रपटसृष्टीतील दिग्गजांसह स्क्रीन शेअर करण्यास मला खरोखर आनंद झाला आहे आणि मी उत्साही आहे. हा एक अतिशय उल्लेखनीय प्रवास ठरणार आहे. अजय देवगण यांच्या दिग्दर्शनाखाली काम करण्याची जास्त प्रतीक्षा करू शकत नाही."
हेही वाचा -वरुण धवन, नीतू कपूर, दिग्दर्शक राज मेहता यांना कोरोनाबाधा