मुंबई- दिग्दर्शक अनीस बझ्मी यांनी अजयसोबतचा आपला एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे. अजयनं नुकतीच अनीस बझ्मींच्या आगामी 'पागलपंती' चित्रपटाच्या सेटवर जाऊन त्यांची भेट घेतली. याच वेळचा हा फोटो आहे.
तो आजही माझ्या चेहऱ्यावर हास्य उमटवतो, बझ्मींनी शेअर केला अजयसोबतचा फोटो - friends forever
आजही जेव्हा तो आम्हा सर्वांना भेटायला सेटवर येतो, माझ्या चेहऱ्यावर हास्य उमटवून जातो, अशी पोस्ट शेअर करत बझ्मी यांनी फ्रेंड्स फॉरएव्हर असं कॅप्शन दिलं आहे.
आम्ही दोघं दररोज भेटत नाही. मात्र, जिथे शेवटचं भेटलो त्या क्षणापासूनच एकमेकांच्या संपर्कात असतो. संपूर्ण पागलपंतीसोबत सेटवर. आजही जेव्हा तो आम्हा सर्वांना भेटायला सेटवर येतो, माझ्या चेहऱ्यावर हास्य उमटवून जातो, अशी पोस्ट शेअर करत बझ्मी यांनी फ्रेंड्स फॉरएव्हर असं कॅप्शन दिलं आहे.
अजय आणि बझ्मी यांनी 'प्यार तो होना ही था', 'दिवानगी' आणि 'हलचल'सारख्या चित्रपटांसाठी एकत्र काम केलं आहे. तर बझ्मींच्या आगामी 'पागलपंती' चित्रपटात अनिल कपूर, जॉन अब्राहम, इलियाना डिक्रूझ, अर्शद वारसी, पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. हा सिनेमा येत्या २२ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे