महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

अनन्याने बालपणीचा फोटो शेअर करत सुहानाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - shahrukh khan

'स्टूडंट ऑफ द ईअर २' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अनन्याने सुहानासोबतचा आपला बालपणीचा फोटो शेअर केला आहे. अनन्याने शेअर केलेल्या या फोटोमध्ये शनाया कपूरदेखील आहे.

अनन्याने सुहानाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

By

Published : May 22, 2019, 2:40 PM IST

मुंबई- बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानची लाडकी लेक सुहानाचा आज वाढदिवस. या खास दिवशी अनेकांनी सुहानाला शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, अनेकांचं लक्ष वेधलं ते अनन्या पांडेने शेअर केलेल्या त्या फोटोने. 'स्टूडंट ऑफ द ईअर २' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अनन्याने सुहानासोबतचा आपला बालपणीचा फोटो शेअर केला आहे.

अनन्याने शेअर केलेल्या या फोटोमध्ये शनाया कपूरदेखील आहे. माझ्या लहानशा बेबीला वाढदिवसाच्या मोठ्या मनापासून शुभेच्छा, असे कॅप्शन अनन्याने या फोटोला दिले आहे. सुहाना, अनन्या आणि शनाया या तिन्ही स्टारकिड्स लहानपणापासूनच जिवलग मैत्रीणी आहेत.

अनन्याने सुहानाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

या तिघींचेही बॉलिूवडमध्ये काम करण्याचे स्वप्न आहे. अनन्याचे हे स्वप्न 'स्टूडंट ऑफ द ईअर २' चित्रपटातून पूर्ण झाले आहे. सुहाना सध्या इंग्लंडमध्ये आपले शिक्षण पूर्ण करत आहे. तर शनाया जान्हवी कपूरच्या आगामी 'कारगिल गर्ल' चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details