महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

वरूणसोबत डान्स करण्याची अनन्याची इच्छा, करणला केली विनंती - varun dhawan

वरूणसोबत डान्स करण्याची मनापासून इच्छा असल्याचे अनन्या पांडेनी म्हटले आहे. तर तारालादेखील सिद्धार्थसोबत डान्स करायचा असल्याचे तिने सांगितले

वरूणसोबत डान्स करण्याची अनन्याची इच्छा

By

Published : May 4, 2019, 8:57 AM IST

मुंबई- अभिनेत्री तारा सुतारिया आणि अनन्या पांडे लवकरच 'स्टुडंट ऑफ द ईअर २' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटातून दोघीही बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. चित्रपटात त्यांच्या अपोझिट टायगर श्रॉफ झळकणार आहे. हा चित्रपट 'स्टुडंट ऑफ द ईअर' चित्रपटाचा सिक्वल असणार आहे.

चित्रपटाच्या पहिल्या भागात वरूण धवन, आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे त्रिकूट झळकले होते. त्यामुळे चित्रपटाच्या सिक्वलमध्ये या कलाकारांचा पाहुणे कलाकार म्हणून तरी समावेश असेल अशी चाहत्यांची अपेक्षा होती. मात्र, आलिया वगळता सिद्धार्थ आणि वरूणचा या चित्रपटात काहीही सहभाग नसल्याचे म्हटले जात आहे.

या गोष्टीमुळे मी खूप नाराज असल्याचे सांगत मला वरूणसोबत डान्स करण्याची मनापासून इच्छा असल्याचे अनन्या पांडेनी म्हटले आहे. तर तारालादेखील सिद्धार्थसोबत डान्स करायचा असल्याचे तिने सांगितले. यासाठी तिने करणला विनंतीदेखील केली आहे. अजूनही चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी एक आठवडा बाकी आहे. त्यामुळे, करण तू प्लीज याबद्दल विचार कर, अशी विनंती अनन्याने केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details