मुंबई- बॉलिवूडमध्ये गेल्या काही दिवसांत अनेक स्टारकिड्सने पदार्पण केले आहे. यात अनन्या पांडे आणि तारा सुतारियाचाही समावेश आहे. या दोन्ही अभिनेत्री 'स्टुडंट ऑफ द ईअर २' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करत आहेत. या पदार्पणाविषयी बोलताना अनन्याने चिंता व्यक्त केली आहे.
स्टारकिड असल्यामुळे अनन्याला 'या' गोष्टीची चिंता - tara sutariya
पुनित मल्होत्राद्वारा दिग्दर्शित 'स्टुडंट ऑफ द ईअर २' चित्रपट येत्या १० मे ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत झळकणार आहे
एक स्टरकिड म्हणून जेव्हा तुम्ही बॉलिवूडमध्ये पदार्पण करता तेव्हा प्रेक्षकांना तुमच्याकडून प्रचंड अपेक्षा असतात. याच गोष्टीचा दबाव सध्या आपल्यावर असल्याचे अनन्याने म्हटले आहे. माझ्या वडिलांनी कॉमेडी चित्रपटांत भूमिका साकारत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे, त्यामुळे मलाही प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या असल्याचे तिने म्हटले आहे.
पुनित मल्होत्राद्वारा दिग्दर्शित 'स्टुडंट ऑफ द ईअर २' चित्रपट येत्या १० मे ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत झळकणार आहे. आता अनन्या आणि तारा सुतारिया प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात यशस्वी ठरतात का? हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.