महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

अनन्याचा 'पती पत्नी और वो'मधील लूक आला समोर, पाहा फोटो - सिनेमा

'स्टूडंट ऑफ द ईअर'नंतर आता या चित्रपटात अनन्याचा कोणता लूक पाहायला मिळणार याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता असतानाच आता अनन्याने आपला या सिनेमातील लूक शेअर केला आहे. फोटोमध्ये अनन्याने चष्मा लावलेला दिसत आहे.

अनन्याचा 'पती पत्नी और वो'मधील लूक आला समोर

By

Published : Aug 3, 2019, 8:02 AM IST

मुंबई- स्टूडंट ऑफ द ईअर चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री अनन्या पांडे आता आपल्या नव्या चित्रपटासाठी सज्ज झाली आहे. 'पती पत्नी और वो' असं शीर्षक असलेल्या या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी अनन्या काही दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेशातील लखनौला रवाना झाली आहे.

'स्टूडंट ऑफ द ईअर'नंतर आता या चित्रपटात अनन्याचा कोणता लूक पाहायला मिळणार याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता असतानाच आता अनन्याने आपला या सिनेमातील लूक शेअर केला आहे. फोटोमध्ये अनन्याने चष्मा लावलेला दिसत आहे. या फोटोसोबतच अनन्याने हेदेखील सांगितलं, की सेटवर मी जेव्हा हा चष्मा लावते, सगळे मला नैना म्हणून आवाज देतात.

अनन्याचा 'पती पत्नी और वो'मधील लूक आला समोर

चित्रपटाबद्दल बोलायचं झाल्यास मुदस्सर अजीज या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. या सिनेमात अनन्याशिवाय कार्तिक आर्यन आणि भूमी पेडणेकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. हा सिनेमा १९७८ मध्ये आलेल्या 'पती पत्नी और वो' चित्रपटाचा रिमेक असणार आहे. येत्या ६ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details