महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

अली अब्बास जफरच्या आगामी चित्रपटात अनन्या-ईशानची वर्णी? - dhadak

ईशान आणि अनन्या या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार असून हा एक रोमँटिक सिनेमा असणार असल्याचे म्हटले जात आहे. चित्रपटाबद्दलच्या इतर गोष्टी अद्याप गुलदस्त्यातच आहेत.

अली अब्बास जफरच्या आगामी चित्रपटात अनन्या-ईशानची वर्णी?

By

Published : Jul 15, 2019, 5:43 PM IST

मुंबई- धडक चित्रपटातून जान्हवी कपूर आणि ईशान खट्टरने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर जान्हवीने आतापर्यंत अनेक चित्रपट साईन केले आहेत. मात्र, ईशानने अद्याप कोणत्याही चित्रपटाची घोषणा केली नाही. अशात आता ईशानची अली अब्बास जफरच्या आगामी चित्रपटात वर्णी लागली असल्याचे समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार 'भारत' चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर अली अब्बास जफर पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. मात्र, या चित्रपटाचं ते दिग्दर्शन करणार नसून निर्मिती करणार आहेत. याच चित्रपटात ईशानची वर्णी लागली आहे. तर त्याच्या अपोझिट 'स्टूडंट ऑफ द ईअर' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अनन्या झळकणार आहे.

ईशान आणि अनन्या या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार असून हा एक रोमँटिक सिनेमा असणार असल्याचे म्हटले जात आहे. चित्रपटाबद्दलच्या इतर गोष्टी अद्याप गुलदस्त्यातच आहेत. दरम्यान अनन्या सध्या आपल्या 'पती पत्नी और वो'च्या चित्रीकरणासाठी लखनौमध्ये आहे. या चित्रपटात तिच्यासोबत कार्तिक आर्यन आणि भूमी पेडणेकरही झळकणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details