मुंबई- अभिनेत्री अनन्या पांडेच्या मालदीवच्या सुट्टीतील एक नवा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. यात ती समुद्राच्या बीचवर बांधलेल्या झोक्यामध्ये आराम करताना दिसत आहे. फ्लोरल बिकीनीतील हा फोटो चाहत्यांना खूप पसंत पडल्याचे दिसत आहे.
२९ डिसेंबर रोजी अनन्या आणि ईशान मुंबई विमानतळावर स्पॉट झाले होते. ते कोठे चाललेत याचा अंदाज तेव्हा नव्हता. परंतु त्यांच्या ताज्या फोटोवरुन लक्षात येते की दोघेही मालदिवच्या धौला अटोला येथील सन सियाम इरु वेली येथे आहेत.
अनन्याने इंस्टाग्रामवर एक नवीन फोटो पिक्चर शेअर केले. यात ती लगून पूलमध्ये पोझ देत असून तिने फ्लोरल स्विमवेअर बिकीनी परिधान केली आहे. हा फोटो इशानने क्लिक केल्याचाही उल्लेख तिने पोस्टमध्ये केलाय.