महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'स्टूडंट ऑफ द ईअर २'नंतर तारा-अनन्या 'या' कारणासाठी पुन्हा आल्या एकत्र - भूमी पेडणेकर

चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास, अनन्या सध्या पती पत्नी और वो सिनेमाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. यात ती कार्तिक आर्यन आणि भूमी पेडणेकरसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. याशिवाय खाली पिली हा सिनेमाही तिने साईन केला आहे

तारा-अनन्या या कारणासाठी पुन्हा आल्या एकत्र

By

Published : Sep 9, 2019, 4:54 PM IST

मुंबई- 'स्टूडंट ऑफ द ईअर २' या सिनेमातून बॉलिवूडच्या दोन स्टारकिड्स तारा सुतारिया आणि अनन्या पांडे यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. या सिनेमाला मिळालेल्या यशानंतर दोघींनी नवे चित्रपटही साईन केले. अशात आता या दोघींची जोडी पुन्हा एकदा एकत्र आली आहे.

यावेळी ही जोडी कोणा चित्रपटासाठी एकत्र आली असून गणेशोत्सवानिमित्त एकत्र आली आहे. अनन्याने आपल्या इन्स्टाग्रामवरुन तारा सुतारियाचासोबतचा फोटो शेअर केला आहे. यात त्या गळाभेट घेताना दिसत असून दोघींनीही पारंपारिक वेशभूषा प्रदान केली आहे.

तारा-अनन्या या कारणासाठी पुन्हा आल्या एकत्र

चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास, अनन्या सध्या 'पती पत्नी और वो' सिनेमाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. यात ती कार्तिक आर्यन आणि भूमी पेडणेकरसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. याशिवाय 'खाली पिली' हा सिनेमाही तिने साईन केला असून ईशान खट्टरसोबत या सिनेमात ती झळकणार आहे. तर तारा सुतारियादेखील सिद्धार्थ मल्होत्राच्या 'मरजाँवा' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details