मुंबई - कोरिओग्राफर आणि चित्रपट दिग्दर्शक फराह खानने 2001च्या ब्लॉकबस्टर 'दिल चाहता है' या गाण्यातील 'वो लडकी है कहां' या गाण्यातील लोकप्रिय हुकस्टेपचा एक रंजक किस्सा शेअर केला आहे.
हे गाणे सैफ अली खान आणि सोनाली कुलकर्णीवर चित्रीत करण्यात आले होते आणि फराहने व्हिडीओसाठी रेट्रो मूड निवडला होता.
फराह खान म्हणाली, "मला आठवतेय की, मी गीताला (कपूर) सांगितले होते की, मी गाणे वाजवीन आणि तू काही स्टेप करशील. ती पक्ष्यांसारखे काहीतरी करू लागली आणि आम्ही त्याचे हुक स्टेप तयार केले."