मुंबई- 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर महामानवाची गौरवगाथा' या मालिकेत अमृत गायकवाड हा बालकलाकार आंबेडकरांची लहानपणीची भूमिका साकारत आहे . छोट्या अमृतचं या भूमिकेसाठी सध्या सगळीकडेच कौतुक होतं आहे. अमृत मुळचा नाशिकजवळच्या घोटी गावातला असून लहानपणापासूनच त्याला अभिनयाची आवड आहे. फावल्या वेळात गाणी ऐकणं हा त्याचा आवडता छंद आहे.
'अमृत' छोट्या आंबेडकरांच्या भूमिकेत जिंकतोय प्रेक्षकांची मनं - amrut
अमृत मुळचा नाशिकजवळच्या घोटी गावातला असून लहानपणापासूनच त्याला अभिनयाची आवड आहे. फावल्या वेळात गाणी ऐकणं हा त्याचा आवडता छंद आहे.
मालिकेसाठी जेव्हा ऑडिशन सुरू होती, तेव्हा अमृतला त्याबद्दल कळालं आणि त्याने थेट ऑडिशनचं ठिकाण गाठले. त्याचा उत्साह आणि हजरजबाबीपणा भाव खाऊन गेला आणि अमृतची छोट्या आंबेडकरांच्या रोलसाठी निवड झाली. अमृत सेटवर सर्वांचाच लाडका आहे. दिग्दर्शक अजय मयेकरांच्या सुचनांचं तो काटेकोरपणे पालन करतो. त्यामुळेच मालिकेतील सीन अधिकाधिक खुलून येतात. मालिकेत अमृतच्या मोठ्या भावाची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या आनंदासोबत त्याचं नातं अधिक घट्ट आहे.
आनंदाशिवाय एक क्षणही तो राहात नाही. हीच केमिस्ट्री सीनमध्येही दिसून येते. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या मालिकेचं शीर्षक गीतही अमृतने तोंडपाठ केलं आहे. सेटवर सतत तो हे शीर्षकगीत गुणगुणत असतो. अभिनयाचं वेड असलेल्या अमृतला याच क्षेत्रात करिअर करायचं आहे. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ ही मालिका त्याच्या आयुष्यातला मैलाचा दगड ठरेल, यात शंका नाही. अमृतच्या कामाचं पहिल्या भागापासूनच कौतुक होतंय. नक्कीच तो बालपणीचे बाबासाहेब पडद्यावर मांडताना कोणतीही कसर बाकी ठेवणार नाही.