मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री अमृता राव आणि आरजे अनमोल यांना आपला मुलगा 'वीर' याला लोकांच्या समोर आहे. अमृताने इन्स्टाग्रामवर पती अनमोलची पोस्ट री-शेअर करीत चाहत्यांना ही माहिती दिली आहे.
अमृताने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये जोडप्याने आपल्या मुलाचा हात हातात घेतलेला दिसत आहे.
त्यांनी आपल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, "हॅलो वर्ल्ड, आमचा मुलगा 'वीर' याला भेटा. तुमच्या आशीर्वाद हवा आहे."
अमृताच्या या पोस्टवर भरपूर प्रतिक्रिया मिळत आहेत. चाहते दोघांचेही अभिनंदन करीत असून भरपूर शुभेच्छा दिल्या जात आहेत.
अलिकडेच अमृताने चाहत्यांना मुलाचे नाव काय असावे याबद्दलच्या सूचनाही मागवल्या होत्या.