मुंबई- अमिताभ बच्चन त्यांच्या अभिनयासोबतच चित्रपटातील त्यांच्या वेगवेगळ्या लूक्समुळेही लोकप्रिय आहेत. बऱ्याच चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या लूक्सवर प्रयोग केले आहेत. यातील पा सारख्या चित्रपटांमधील लूकमध्ये तर त्यांना ओळखणंही कठीण जातं. असाच काहीसा वेगळा लूक त्यांच्या आगामी 'गुलाबो सिताबो' चित्रपटातही पाहायला मिळणार आहे.
'गुलाबो सिताबो'मधील लूक साकारायला अमिताभला लागतात इतके तास - reveal
अमिताभने बऱ्याच चित्रपटांमध्ये आपल्या लूक्सवर प्रयोग केले आहेत. असाच काहीसा वेगळा लूक त्यांच्या आगामी 'गुलाबो सिताबो' चित्रपटातही पाहायला मिळणार आहे. आता अमिताभ यांनी हा लूक साकारण्यासाठी किती वेळ लागतो, हे सांगत मेकअप करतानाचा फोटो शेअर केला आहे.
काही दिवसांपूर्वीच त्यांचा चित्रपटातील फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला होता. यानंतर आता अमिताभ यांनी हा लूक साकारण्यासाठी किती वेळ लागतो, हे सांगत मेकअप करतानाचा फोटो शेअर केला आहे. प्रत्येक दिवशी गुलाबो सिताबोची शूटींग करण्यासाठी अमिताभ यांना तब्बल ३ तास आपल्या मेकअपसाठी द्यावे लागतात, असे अमिताभ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून सांगितले आहे.
दरम्यान 'गुलाबो सिताबो' या चित्रपटात अमिताभ यांच्याशिवाय अभिनेता आयुष्मान खुरानादेखील झळकणार आहे. सुजीत सरकार हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. पुढच्या वर्षी २४ एप्रिलला हा चित्रपट पाहायला मिळणार असून याशिवाय अमिताभ 'चेहरे' चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.