मुंबई - बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी आपल्या चित्रपटाचा एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. यात त्यांनी आपल्या न बनलेल्या चित्रपटाचा खुलासा केला आहे. अमिताभ यांनी या चित्रपटाचा एक फोटो सेअर केलाय. जो चित्रपट कधीच बनला नाही.
अमिताभ बच्चन यांनी या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, "एक चित्रपट जो कधीही बनला नव्हता. स्टील फोटो शूट झाले, शीर्षकही झाले पण चित्रपट बनला नाही."
स्टॉक फोटोमध्ये अभिनेता अमिताभ बच्चन तारुण्याच्या काळात मजेदार ग्रे जॅकेट आणि ब्लॅक पँटमध्ये दिसत आहेत. त्यांच्या कंबरेला बंदुकही दिसत आहे.