महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

अमिताभ बच्चन यांचा सुरक्षा रक्षक जितेंद्र शिंदेंची बदली; संपत्तीची होणार चौकशी? - Jitendra Shinde

ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याकडे 2015 पासून सुरक्षा रक्षक म्हणून कामाला असलेल्या जितेंद्र शिंदेची डीबी मार्ग पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. जितेंद्र शिंदे यांना अमिताभ बच्चन यांच्याकडून वर्षाला दीड कोटी रुपये मिळत असल्याची चर्चा सुरू होती.

अमिताभ बच्चन यांचा बॉडीगार्ड जितेंद्र शिंदेंची बदली; संपत्तीची होणार चौकशी?
Amitabh Bachchan's police bodyguard transferred amid reports of 'Rs 1.5 crore annual income'

By

Published : Aug 27, 2021, 12:55 PM IST

Updated : Aug 27, 2021, 1:06 PM IST

मुंबई - मेगास्टार अमिताभ बच्चन हे सुरक्षा रक्षक जितेंद्र शिंदेंला वर्षाला दीड कोटी रुपये देत असल्याच्या चर्चा सुरू होत्या. यातच पोलीस विभागाकडून जितेंद्र शिंदें यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. पोलीस आयुक्तांनी 5 वर्षाहून अधिक काळ एकाच ठिकाणी सेवा बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश दिले होते. यात जितेंद्र यांची बदली डीबी मार्ग पोलीस ठाण्यात करण्यात आल्याचे पोलीस विभागाकडून सांगण्यात येत आहे. त्यातून ही बदली झाल्याचा निर्वाळा देण्यात आला आहे.

अमिताभ बच्चन यांना एक्स दर्जाची सुरक्षा मुंबई पोलिसांकडून प्रदान करण्यात आली होती. मुंबई पोलिसांचे दोन कॉन्स्टेबल सतत अमिताभ यांच्यासोबत असतात. शिंदे हे त्यापैकी एक आहेत. शिंदे हे 2015 पासून अमिताभ यांच्या सुरक्षेत होते. अमिताभ घरातून बाहेर पडल्यापासून ते सेट, फिल्म शूटिंगपर्यंत ते अमिताभ यांच्यासोबत सावलीप्रमाणे असायचे. जगभरात अमिताभ यांचे चाहते आहेत. जेव्हा अमिताभ बाहेर पडतात. तेव्हा चाहते त्यांच्या भोवती गरडा घालतात. यावेळी जितेंद्र यांच्यावर अमिताभ यांच्या सुरक्षेची जबाबदारी असते.

अमिताभ बच्चन यांचा जितेंद्र शिंदे यांच्यावर प्रचंड विश्वास आहे. शिंदे हे सावलीसारखे अमिताभ यांच्यासोबत असायचे. जितेंद्र शिंदे यांना अमिताभ यांच्याकडून वर्षाला दीड कोटी रुपये मिळत होते. म्हणजे महिन्याला त्यांची कमाई 12 लाखांच्याही वर होती, अशी चर्चा सुरू आहे. तसेच जितेंद्र शिंदेची स्वत:ची सुरक्षा एजन्सी असून ती पत्नीच्या नावे असल्याची चर्चा आहे. अभिनेता आणि निर्माता एलीजाह वूड भारत दौऱ्यावर आला होता. तेव्हा जितेंद्र यांनी त्याला सुरक्षा पुरलवी होती, असेही म्हटलं जात आहे. जर अमिताभ बच्चन शिंदे यांना महिन्याला पगार देत असतील. तर सरकारी कर्मचारी दोन ठिकाणांवरून पगार घेऊ शकत नाही. हे नियमांच्या बाहेर आहे. यामुळे शिंदे यांच्या संपत्तीची पोलीस विभागाकडून चौकशी होणार असल्याची माहिती आहे.

हेही वाचा -सलमान खानच्या बॉडीगार्डचा शिवसेनेत प्रवेश, शेवटच्या दिवशी करणार प्रचार

Last Updated : Aug 27, 2021, 1:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details