मुंबई - बॉलिवूड अभिनेता अजय देवगण लवकरच अमिताभ बच्चन यांना दिग्दर्शित करणार आहे. अमिताभ यांना घेऊन अजय 'मेडे' हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहे. यात अजय देवगण आणि अमिताभ एकत्र भूमिकाही करणार आहेत. यापूर्वी बिग बी आणि अजय यांनी 'मेजर साहब', 'खाकी', 'सत्याग्रह' आणि 'हिंदुस्तान की कसम' या चित्रपटात एकत्र काम केले आहे. हे दोघे सात वर्षानंतर पुन्हा एकत्र दिसणार आहेत. 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सत्याग्रह’ या चित्रपटात त्यांनी अखेरचे एकत्र काम केले होते.
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार अजय देवगण - Amitabh Bachan latest news
अभिनेता अजय देवगण लवकरच अमिताभ यांना घेऊन अजय 'मेडे' हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहे. यात अजय देवगण आणि अमिताभ एकत्र भूमिकाही करणार आहेत.
अजय देवगण
'मेडे' या चित्रपटाचे केवळ दिग्दर्शनच नाही तर याची निर्मितीही अजय देवगण करणार आहे.
या प्रोजेक्टच्या जवळच्या एका सूत्रांनी सांगितले की, "अजय हैदराबादमध्ये या चित्रपटाची सुरूवात 'भुज: द प्राइड ऑफ इंडिया' या चित्रपटामधील काम पूर्ण करून करणार आहे. सध्या केबीसीसाठी मेगास्टार शुटिंग करीत आहे."