मुंबई- कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांमध्ये महापुराने हाहाकार माजवला आहे. या पुरस्थितीत अनेक नागरिक बेघर झाले आहेत. अशा परिस्थितीत संपूर्ण महाराष्ट्र पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे सरसावला असून शक्य ती मदत सामान्य नागरिक करत आहेत. आता बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चनही मदतीसाठी धावून आले आहेत.
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी बिग बी आले धावून, चाहत्यांनाही केलं आवाहन - मदतीचं आवाहन
महाराष्ट्रातील नागरिक संकटात असताना मुंबईत मोठ्या संख्येने राहणारे बॉलिवूड कलाकार मदतीचा हात पुढे का करत नाही? असा सवाल अनेकांनी उपस्थित केला होता. ज्यानंतर आता अमिताभ यांनी ट्विट करत आपणही मदत करत असल्याचं जाहीर केलं

महाराष्ट्रातील नागरिक संकटात असताना मुंबईत मोठ्या संख्येने राहणारे बॉलिवूड कलाकार मदतीचा हात पुढे का करत नाही? असा सवाल अनेकांनी उपस्थित केला होता. ज्यानंतर रितेश देशमुखनं मुख्यमंत्री मदत निधीत चेक जमा केला. यानंतर आता अमिताभ यांनी ट्विट करत आपणही मदत करत असल्याचं जाहीर केलं.
अमृता फडणवीस यांनी पुरग्रस्तांना मदत करण्यासंदर्भात लिहिलेलं ट्विट रिट्विट करत अमिताभ म्हणाले, आपल्या भावा-बहिणींसाठी दान करा. मी करत आहे...आणि तुम्ही? असा सवाल करत बिंग बींनी चाहत्यांना मदतीचं आवाहन केलं आहे.