मुंबई- अभिनेता अजय देवगनने आपल्या सोशल मीडियावरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओतून बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन जनतेशी संवाद साधत आहेत. कोरोनासोबत लढा देऊन बऱ्या झालेल्या लोकांना मानसिक आधार देण्याचं आवाहन ते नागरिकांना करत आहेत.
कोरोनावर उपचार घेऊन घरी येणाऱ्यांबद्दल बिग बी म्हणतात, कोरोना आपल्यावर दोन प्रकारे हमला करतो. एक शारीरिक आणि दुसरा मानसिक. मानसिक हमला आपल्या मनात शंका निर्माण करतो. आपण कोरोनावर उपचार घेऊन आलेल्या त्या व्यक्तीलाच घाबरु लागतो.
पुढे अमिताभ म्हणाले, तुम्ही टीव्हीवर पाहिले असेल, की कोरोनातून ठीक झालेल्यांना डॉक्टर टाळ्या वाजवून घरी पाठवत आहेत. रुग्णालयातून आल्यावर घरचे आणि आसपासचे लोक त्यांच्यावर पुष्पवृष्टी करत आहेत. शारीरिक लढाईसाठी तर जगभरातील जानकार प्रयत्न करत आहेत. मात्र, मानसिक लढाई आपल्यालाच जिंकायची आहे. जर आपण हारलो, तर कोरोना जिंकेल आणि हे आपण कधीच होऊ द्यायचं नाही.
अजय देवगनने हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनही दिलं आहे. यात तो म्हटला, कोरोनावर मात देत जे रुग्ण बरे होऊन घरी आलेत त्यांच्या हिमतीचं कौतुक करु आणि त्यांच्या कुटुंबाला आधार देऊ. सकारात्मक राहून कोरोनाची ही साखळी तोडण्यास मदत करा, असं आवाहन त्याने लोकांना केलं आहे