हैदराबाद - आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमधील मुख्य अर्थतज्ञ गीता गोपीनाथ यांनी एक स्पेशल व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडिओमध्ये अमिताभ बच्चन 'कौन बनेगा करो़डपती' या शोमध्ये एका स्पर्धकाशी चर्चा करताना गीता गोपीनाथ यांची स्तुती करत असल्याचे दिसत आहेत. मात्र, या व्हिडिओमुळे काही नेटीझन्सनी अमिताभ यांना ट्रोल केले आहे.
अर्थतज्ञ गीता गोपीनाथ यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे अमिताभ झाले ट्रोल - अमिताभ बच्चन ट्रोलिंग न्यूज
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमधील मुख्य अर्थतज्ञ गीता गोपीनाथ यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओमुळे अमिताभ बच्चन सोशल मीडियावर ट्रोल झाले आहेत.
![अर्थतज्ञ गीता गोपीनाथ यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे अमिताभ झाले ट्रोल Amitabh Bachchan and Gita Gopinath](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-10359365-thumbnail-3x2-gita.jpg)
हॉट सीटवर बसलेल्या स्पर्धकाला अमिताभ बच्चन एक फोटा दाखवतात. हा फोटो आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमधील मुख्य अर्थतज्ञाचा असून त्यांचा सुंदर चेहरा पाहता कुणीही म्हणान नाही की, त्या अर्थशास्त्राशी निगडीत आहेत, असे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. गीता गोपीनाथ यांनी स्वत:च्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ ट्विट केला आहे. आपण अमिताभ यांची खूप मोठी चाहती असून हा व्हिडिओ आपल्यासाठी खास असल्याचे गीता यांनी म्हटले आहे.
नेटीझन्सच्या मते, अमिताभ बच्चन यांची गीता गोपीनाथ यांच्यावरील कमेंट ही लिंगभेदाची आहे. एका व्यक्तीने लिहिले आहे की, 'अर्थशास्त्राशी निगडीत असलेल्या माझ्या ओळखीतील बहुतांशी मुली या सुंदरच आहेत. माझ्या मते अमिताभ बच्चन यांनी एकदा अर्थशास्त्राच्या वर्गाला भेट दिली पाहिजे'