महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

हवामान जागृती मोहिम करण्यासाठी अमिताभने घेतला पुढाकार

महानायक अमिताभ बच्चन यांनी हवामान बदलाच्या प्रश्नावर लक्ष देण्यासाठी सोशल मीडियावर लोकांना जागरुक होण्यासाठी पोस्ट लिहिली आहे. निसर्गाचे रक्षण करण्यासाठी लोकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Amitabh Bachchan
महानायक अमिताभ बच्चन

By

Published : Jun 2, 2020, 3:17 PM IST

मुंबई - जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ अभिनेता अमिताभ बच्चन यांनी निसर्गाचे रक्षण करण्यासाठी हवामानाबद्दल जागरुक होण्याचेची गरज व्यक्त केली आहे.

दरवर्षी 5 जून रोजी साजरा होणार्‍या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध पर्यावरणीय विषयांबद्दल जागरूकता वाढविण्याची आणि आपला ग्रह वाचविण्याची आवश्यकता आहे. अमिताभने हवामान बदलाच्या प्रश्नावर लक्ष देण्याबाबत ठाम भूमिका घेतली आणि लोकांना निसर्गाच्या संरक्षणासाठी काही करण्याचे आवाहन केले आहे..

क्लायमेट वॉरियरच्या हॅशटॅगसह, 77 वर्षीय बच्चन यांनी ट्विट केले: "हवामान बदलाचा परिणाम आमच्यावर होतोय हे वास्तव आहे. निसर्ग मातेचे रक्षण करण्यासाठी प्रयत्नशील राहा.

यानंतर या हॅशटॅगचा वापर करीत अभिनेत्री भूमी पेडणेकरनेही निसर्ग मातेच्या रक्षणासाठी एकत्र येण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे.

पृथ्वीचे रक्षण करण्यासाठीच्या या माहिमेत मनोरंजन जगतातील आघाडीच्या लोकांनी पुढे येण्याचे आवाहन केले जात आहे.

अभिनेत्री भूमी पेडणेकर 'क्लायमेट वॉरियर' ही मोहिम राबवत असून पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या खऱ्या योध्यांचा सन्मान आणि देशातील तरुणांना या कार्यात सहभागी करुन घेण्याचा प्रयत्न करीत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details