महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 14, 2020, 6:47 PM IST

ETV Bharat / sitara

अमिताभ आणि अभिषेक यांना पुढील सात दिवस रहावे लागणार रुग्णालयात

अमिताभ आणि अभिषेक बच्चन कोविड -१९ च्या उपचाराला प्रतिसाद देत असल्याचे हॉस्पिटलच्या सूत्रांनी सांगितले. वडील-मुलाची जोडी किमान सात दिवस रुग्णालयात असतील.

Amitabh Bachchan, son Abhishek
अमिताभ आणि अभिषेक

मुंबई: कोविड - १९ च्या उपचारासाठी इस्पितळात दाखल झालेल्या मेगास्टार अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिनेता अभिषेक बच्चन उपचाराला चांगला प्रतिसाद देत असल्याचे रुग्णालयातील सूत्रांनी मंगळवारी सांगितले.

अमिताभ (वय 77) आणि अभिषेक (वय 44) यांनी 11 जुलै रोजी ट्विटरवर त्यांचे कोरोना पॉझिटिव्हचे निदान झाल्याचे आणि ते नानावटी रुग्णालयात आयसोलेशन विभागात उपचार घेत असल्याचे कळवले होते.

"दोघांचीही प्रकृती स्थिर आहेत आणि उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत. त्यांना किमान सात दिवस हॉस्पिटलमध्ये राहावे लागेल," असं रुग्णालयाच्या व्यक्तीने सांगितले.

अमिताभ आणि अभिषेकसह अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (वय 46) आणि आठ वर्षांची आराध्या बच्चन हिलाही कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले होते.

हेही वाचा - 'अब कभी फोन भी नहीं आयेगा तेरा...', सुशांतच्या आठवणीने मुकेश छाब्रा भावूक

रविवारी मायक्रोब्लॉगिंग साइटवर अभिषेकने ऐश्वर्या आणि आराध्याच्या निदानाची पुष्टी केली आणि तो म्हणाला की "ते घरी सेल्फ क्वारंटाईनमध्ये राहणार आहेत."

सोमवारी रात्री अमिताभ यांनी त्यांच्या चाहत्यांचे आणि हितचिंतकांचे आभार मानले होते. चाहत्यांच्या प्रेमाच्या संदेशामुळे त्यांच्या अलिप्तपणाचा अंधार उजळला, असल्याचे बच्चन यांनी लिहिले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details