महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

अमिताभ म्हणतायेत, गंदगी तो देखने वालों की 'नज़रों में होती है

गंदगी तो देखने वालों की 'नज़रों में होती है..'वरना कचरा चुनने वालों को तो "उसमें भी रोटी नज़र आती है", असं त्यांनी आपल्या एका ट्विटमध्ये म्हटलं आहे.

अमिताभनं शेअर केलं ट्विट

By

Published : Jun 3, 2019, 8:08 PM IST

मुंबई- बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन अभिनयाशिवाय आपल्या कवितांनीही चाहत्यांची मन जिंकत असतात. त्यांच्या सामाजिक विषयांवर भाष्य करणाऱ्या कविता सर्वांनाच विचार करण्यास भाग पाडणाऱ्या असतात. नुकतंच अमिताभ यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून अशाच काही ओळी शेअर केल्या आहेत.

गंदगी तो देखने वालों की 'नज़रों में होती है..'वरना कचरा चुनने वालों को तो "उसमें भी रोटी नज़र आती है", असं त्यांनी आपल्या एका ट्विटमध्ये म्हटलं आहे. तर दुसरीकडे "संसार जरूरत के नियम पर चलता है। सर्दियों में जिस सूरज का इंतज़ार होता है, उसी सूरज का गर्मियों में तिरस्कार भी होता है। "अतः आपकी कीमत तब होगी, जब आपकी जरूरत होगी, असं म्हणत गरजेपुरता माणसांचा वापर करणाऱ्यांनाही त्यांनी टोला लगावला आहे.

तर आणखी एका ट्विटमध्ये "कारवाँ -ए -ज़िन्दगी हसरतो के सिवा कुछ भी नहीं, ये किया नहीं, वो हुआ नहीं, ये मिला नहीं, वो रहा नहीं.." असं म्हणत आयुष्यभर सुखासाठी चाललेल्या माणसाच्या धडपडीचं वास्तविक वर्णन त्यांनी केलं आहे. अमिताभ यांच्या या ट्विटला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळताना दिसत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details