मुंबई - महानायक अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर अभिषेक बच्चनसोबतचा एक खास कोलाज फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये बिग बी आणि अभिषेकचा सेम टू सेम लुक पाहायला मिळतो.
अमिताभ बच्चन यांनी त्यांचे फोटो शेअर करुन त्यावर खास कॅप्शनही दिले आहे. 'बडे मिया तो बडे मिया, छोटे मिया सुभान अल्लाह', असे त्यांनी लिहले आहे.
'जेव्हा मुलगा तुमचे कपडे आणि चप्पल घालायला सुरुवात करतो, तेव्हा तो मित्र बनतो. तू कसा आहेस जोई बॉब बिस्वास'?, असा प्रश्नही त्यांनी अभिषेकला विचारला आहे.