मुंबई- सध्या कलाकारांना सोशल मीडियावर सक्रीय राहणं जणू बंधनकारकच झालं आहे. घडलेल्या महत्त्वाच्या घटनेवर एखाद्या कलाकाराने जर आपली प्रतिक्रिया दिली नाही, तर त्यांच्यावर टीकेची झोड उठते. याचा सामना सध्या सर्वच कलाकारांना करावा लागत आहे.
..म्हणून अमिताभ म्हणतात, बोलण्याची आणि शांत राहण्याचीही किंमत मोजावी लागते - social media
किंमत दोन्हीचीही मोजावी लागते, बोलण्याचीही आणि शांत राहण्याचीही असं ट्विट अमिताभ यांनी केलं आहे. तर याखाली सोशल मीडिया की पहचानी हैं, जानी मानी कहानी है, असंही त्यांनी लिहिलं आहे.
हीच व्यथा मांडणारं एक खास ट्विट अमिताभ यांनी आपल्या ट्विटरवर शेअर केलं आहे. किमंत दोन्हीचीही मोजावी लागते, बोलण्याचीही आणि शांत राहण्याचीही असं हे ट्विट आहे. तर याखाली सोशल मीडिया की पहचानी हैं, जानी मानी कहानी है, असंही त्यांनी लिहिलं आहे.
एखाद्या घटनेवर काही बोललं तरीही आपणं ट्रोल होतो आणि काही बोललं नाही तरीही ट्रोल होतो, यावरच भाष्य करणारं हे ट्विट आहे. केवळ दोन ओळींतून सध्याच्या सोशल मीडियावरील परिस्थितीचं वास्तव समोर मांडणारं बिग बींचं हे ट्विट ट्रोलर्सना विचार करायला भाग पाडणारं आहे.