महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

EMOJI DAY: अमिताभ म्हणतायेत, इमोजी..भाषा तुम हमरी, बदल दियो जी - twitter

इमोजी, भाषा तुम हमरी, बदल दियो हो जी, एकही दिन हम मनावेंगे कैसे, तुमहरी जरूरत तो रोज पडे है जी, असं म्हणत अमिताभ यांनी इमोजीचं सध्याच्या काळातील महत्त्व सांगितलं आहे.

अमिताभ बच्चन

By

Published : Jul 17, 2019, 7:19 PM IST

मुंबई- सध्याच्या काळात सोशल मीडियाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं आहे. बहुतेक जणांच्या दिवसाची सुरूवात आणि शेवट सोशल मीडियावरच होताना दिसतो. यात इमोजींचा होणार वापर तर अफाटच. आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी तरूणाई सर्रास इमोजींचा वापर करताना दिसते. अशाच या तरूणांच्या इमोजीचा आज दिवस.

इमोजी डे निमित्त अमिताभ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक खास ट्विट शेअर केलं आहे. इमोजी, भाषा तुम हमरी, बदल दियो हो जी, एकही दिन हम मनावेंगे कैसे, तुमहरी जरूरत तो रोज पडे है जी, असं म्हणत अमिताभ यांनी इमोजीचं सध्याच्या काळातील महत्त्व सांगितलं आहे.

यासोबतच बिग बींनी सर्व इमोजीजचा फोटोही शेअर केला आहे. ज्यात फोनची बॅटरी पूर्ण चार्ज असतानाची हॅपी इमोजी ते बॅटरी लो झाल्यानंतर बदलेले चेहऱ्यावरील भाव पाहायला मिळत आहेत. सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असलेल्या अमिताभ यांचं हे ट्विट हसवणारं आणि तितकंच सध्याच्या परिस्थितीची जाणीव करून देणारं आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details