महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

पीढ़ी दर पीढ़ी; अमिताभने शेअर केला त्यांच्या तीन पिढ्यांचा फोटो - photo

पहिल्या फ्रेममध्ये अमिताभ यांचा लहानपणीचा फोटो असून यात ते हरिवंशराय बच्चन यांच्यासोबत दिसत आहेत. दुसऱ्या फ्रेममध्ये अमिताभ आणि अभिषेक बच्चन आहेत. तर तिसऱ्या फ्रेममध्ये अभिषेक आणि त्याची मुलगी आराध्या आहे.

अमिताभने शेअर केला त्यांच्या तीन पिढ्यांचा फोटो

By

Published : May 30, 2019, 7:55 PM IST

मुंबई- बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन यांनी बच्चन कुटुंबाच्या तीन पिढ्यांचे फोटो एकाच फ्रेममध्ये शेअर केले आहेत. सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असणाऱ्या बिग बींनी बुधवारी रात्री आपल्या ट्विटर अकाऊंटवरून कोलाज केलेला एक फोटो शेअर केला आहे.

पहिल्या फ्रेममध्ये अमिताभ यांचा लहानपणीचा फोटो असून यात ते हरिवंशराय बच्चन यांच्यासोबत दिसत आहेत. दुसऱ्या फ्रेममध्ये अमिताभ आणि अभिषेक बच्चन आहेत. तर तिसऱ्या फ्रेममध्ये अभिषेक आणि त्याची मुलगी आराध्या आहे. पीढ़ी दर पीढ़ी ; जीवनी की पीढ़ी, असे कॅप्शन अमिताभ यांनी या फोटोला दिले आहे.

अमिताभने शेअर केला त्यांच्या तीन पिढ्यांचा फोटो

चित्रपटांविषयी बोलायचे झाल्यास अमिताभ लवकरच अयान मुखर्जीद्वारा दिग्दर्शित 'ब्रह्मास्त्र' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटात अमिताभ यांच्याशिवाय रणबीर कपूर, आलिया भट्ट, डिंपल कपाडिया आणि मौनी रॉय यांच्याही मुख्य भूमिका असणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details