महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

अमिताभ बच्चन यांनी चाहत्यांना सांगितला ''सुखी जीवनाचा कानमंत्र'' - Bollywood megastar Amitabh Bachchan

अमिताभ बच्चन यांनी आपल्या चाहत्यांना सुखी जीवनाचा मंत्र सांगितलाय. एक पोस्ट लिहून चाहत्यांना नेहमी सक्रिय राहण्याचेही आवाहन त्यांनी केलंय.

Amitabh Bachchan says 'trick
अमिताभ बच्चन

By

Published : Nov 5, 2020, 3:53 PM IST

मुंबई- बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी बुधवारी चाहत्यांना आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून सक्रिय राहून कार्य करण्याची सूचना दिली. आपल्या टिप्स शेअर करताना बिग बीने ट्विटमध्ये लिहिलंय, "तुम्ही तुमच्या शरीराला जितका आराम द्याल, तितके शरीर जास्त आराम मागेल आणि जितके काम घ्याल तितके ते जास्त कार्य करेल.''

महानयक सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असतात, नेहमी आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहून सतत मनोरंजन आणि प्रबोधन करीत असतात.

अमिताभ बच्चन यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.

यात बिग बीने लिहिले, की "सकाळी आपल्याला फक्त एकाच व्यक्तीला सामोरे जावे लागते, ते तुम्ही स्वतः असता. जेव्हा तुम्ही तरुण असता तेव्हा वाटते, की संपूर्ण जागाला खूश करायचे आहे. नाही! तेच करा ज्यातून तुम्ही खूश व्हाल. तसे आयुष्य बनवा जसे तुम्हाला जगायचे आहे. जर तुम्ही असे करू शकाल तर प्रत्येक सकाळी कुणावर तरी प्रेम करताना दिसाल.''

ABOUT THE AUTHOR

...view details