मुंबई - मेगास्टार अमिताभ बच्चन आपल्या अवयवांचे दान करणार आहेत.अमिताभ यांनी बुधवारी इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. कौन बनेगा करोडपतीच्या सेटवरील हा फोटो असून त्यात हिरव्या रंगाची रिबन त्यांच्या छातीवर दिसत आहेत.
अमिताभ बच्चन बनले 'ऑर्गन डोनर'!! - अवयव दाता अमिताभ
बॉलिवूडचे आयकॉन अमिताभ बच्चन यांनी स्वत: चा एक फोटो शेअर केला आहे, ज्यात त्यांनी आपल्या छातीवर हिरव्या रंगाची रिबन लावल्याचे दिसते. यावरून त्यांनी आपण अवयव दान (ऑर्गन डोनर) करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. बच्चन यांच्या या कृतीचे सर्व थरातून कौतुक होत आहे.
अमिताभ बच्चन
सोशल मीडियावर बर्यापैकी सक्रिय असलेल्या ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी मथळ्यातील "ग्रीन रिबन"चे महत्त्व स्पष्ट केले आहे. आपण अवयवदाता असल्याचे यातून स्पष्ट केले आहे. "ग्रीन रिबन लावण्याचे महत्त्व.. मीऑर्गन डोनर आहे! .. दुसर्याला नवे आयुष्य देणार आहे," असे त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे.
अमिताभ यांनी आपल्या अवयव दानाची घोषणा केल्यामुळे अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. सोशल मीडियावर चाहते त्यांचे कौतुक करीत आहेत.