महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

अमिताभ बच्चनने घेतला कोरोना लशीचा पहिला डोस - अमिताभने घेतला कोरोनाचा पहिला डोस

अभिषेक बच्चन वगळता बच्चन कुटुंबातील सर्व सदस्यांनी कोरोनाची लस घेतली असल्याचा खुलासा अमिताभ बच्चन यांनी केला आहे. बच्चन यांनी लिहिलेल्या अधिकृत ब्लागमध्ये याचा उल्लेख केला आहे.

Amitabh Bachchan receives COVID-19 vaccine
अमिताभ बच्चनने घेतली कोरोनाची लस

By

Published : Apr 2, 2021, 2:31 PM IST

मुंबई - कोरोनाव्हायरस लसचा पहिला डोस मिळाल्याचे मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी शुक्रवारी सांगितले.

अधिकृत ब्लॉगवर लिहिताना वर्षीय अमिताभ यांनी खुलासा केला की मुलगा अभिषेक बच्चन वगळता त्याच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला कोरोनव्हायरस लसचा पहिला डोस मिळाला आहे.

"लसीकरण केले आहे... सर्व ठीक आहे ... काल कुटुंब आणि कर्मचारी यांची कोव्हीड चाचणी केली होती ... निकाल आज आला ... सर्व चांगले आहेत, सर्वांची चाणी निगेटीव्ह आली आहे.. तर लसही घेतली आहे.," असे अमिताभ बच्चन यांनी लिहिले. "

अमिताभ बच्चनने घेतली कोरोनाची लस

अभिषेक वगळता सर्व कुटूंबाचे लसीकरण पूर्ण झाले आहे. तो लोकेशनवर असून परतल्यानंतर तोही लस घेणार आहे.

लसीकरण केंद्रावर लस घेत असतानाचा एक फोटो अमिताभ यांनी शेअर केला आहे.

हेही वाचा - चैतन्यमयी टायगर श्रॉफच्या चपळता आणि फिटनेसचे रहस्य!

अभिषेक बच्चन त्याच्या आगामी सोशल कॉमेडी "दसवी" चित्रपटाच्या शुटिंसाठी आग्रा येथे काम करीत आहे. गुरुवारी त्याचे येथील शूट पूर्ण झाले.

लसीकरणाच्या प्रक्रियेला अमिताभ बच्चन यांनी "ऐतिहासिक" म्हटले आहे. यावर स्वतंत्र ब्लॉग लिहिणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

गेल्या वर्षी अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, अभिनेत्री-सून ऐश्वर्या राय बच्चन आणि त्यांची नात आराध्या बच्चन यांनी कोरोना व्हायरसची लागण झाली होती. मुंबईतील खासगी रुग्णालयात त्यांनी यावर उपचार घेतले होते.

सलमान खान, संजय दत्त, शर्मिला टागोर, धर्मेंद्र, हेमा मालिनी, मोहनलाल, जीतेंद्र, कमल हासन, नागार्जुन, रोहित शेट्टी, नीना गुप्ता, राकेश रोशन आणि जॉनी लीव्हर या बॉलिवूड सेलेब्रिटीनंतर अमिताभ बच्चन यांनी कोरोनाची लस घेतली आहे.

केंद्र सरकारने जाहीर केले आहे की १ एप्रिलपासून ४५ वर्ष पूर्ण झालेल्या सर्व नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे.

हेही वाचा - एव्हरग्रीन रेखा ने नेहा कक्कर ची भरली ‘ओटी’!

ABOUT THE AUTHOR

...view details