मुंबई - अमिताभ बच्चन यांना ट्रोल करणाऱ्या युजरला त्यांनी कडक शब्दात उत्तर दिले आहे. मुंबईच्या रुग्णालयातून त्यांनी एक ब्लॉग लिहिला असून त्यांनी खूप भावनिक गोष्टीही लिहिल्या आहेत.
कोरोना व्हायरसमुळे त्यांचा मृत्यू व्हावा अशी आशा बाळगणाऱ्या त्या अज्ञात ट्रोलर्सबद्दल बच्चन लिहितात, "ते लिहून मला सांगतात, 'मला आशा आहे की आपण या कोव्हिडमुळे मरणार आहात'".
"अहो, मिस्टर अनामिक, तुम्ही तुमच्या वडिलांचे नावसुध्दा लिहिलेले नाही..कारण तुमचे वडिल कोण आहेत हे माहिती नसणार...दोन गोष्टी घडू शकतात... एक तर मी मरू शकतो किंवा जगू शकतो. जर माझा मृत्यू झाला तर तुला सेलेब्रिटीच्या नावावर आपली टिप्पणी करण्यासाठी जबदस्तीने लिहिण्यास मिळणार नाही.", असे बच्चन यांनी लिहिलंय.
''तुमच्या लिखाणाकडे लक्ष देण्याचे कारण म्हणजे तू अमिताभ बच्चन यांना चापट मारली आहेस...आता ते फार काळ अस्तित्वात राहणार नाही...जर देवाच्या कृपेने मी जगलो तर तुला वादळ सहन करावे लागेल. फक्त माझ्याकडूनच नाही तर ९० दशलक्ष फॉलोअर्स कडून अत्यंत कडवेपणाने.'',असे बच्चन यांनी पुढे म्हटलंय.