मुंबई - बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन रुग्णालयामध्ये आयसोलेशनमध्ये आपला वेळ घालवत आहे. आपल्या आयुष्यातील निर्णय आणि त्याचा झालेला परिणाम यावर बच्चन चिंतन करीत आहेत.
अमिताभ यांनी आपल्या ब्लॉडवर त्यांचे दिवंगत वडिल हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेच्या काही ओळी शेअर केल्या आहेत. आयुष्यात घेतलेल्या निर्णयांचा विचार करण्यासाठी वेळ मिळाल्याचे त्यांनी म्हटलंय. आपल्या निर्णयावर ते या काळात पुन्हा नजर फिरवू शकतात.
आपल्या पोस्टच्या सुरुवातीला बच्चन यांनी लिहिलंय, "जीवनाच्या गडबडीमध्ये कुठेतरी बसून काहीतरी विचार करण्याचा मला वेळच मिळाला नाही. मी जे केले. जे मी म्हणालो आणि जे मी मानले. त्याच्यात काय चांगले होते आणि काय वाईट. आता मला वेळ मिळाला आहे."
हेही वाचा - सुशांत मृत्यू प्रकरण : ..तर पद्मश्री पुरस्कार परत करेन - कंगना रनौत
त्यांनी पुढे लिहिलंय, "या क्षणांमध्ये मनात, मागे सुटलेल्या घटनांचे शब्द, कधीही कल्पना करु शकतो अशा घटना. विशिष्ट, योग्य आणि घटनेच्या स्पष्टतेसह. याचे आश्चर्य वाटते की, याचा काय परिणाम समोर आला आहे. मग तुम्हाला आश्चर्य वाटू शकते की ही गोष्ट वेगळ्या प्रकारे केली पाहिजे होती किंवा नाही केली तर बरे झाले असते. परंतु आश्चर्य हे आहे की तुम्ही फक्त तेवढेच करु शकत होता, जितके नशिबात होते."
अमिताभ बच्चन सध्या मुंबईच्या नानावटी रुग्णालयात आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती झाले आहेत. त्यांच्या परिवारामध्ये अभिषेक बच्चन, ऐश्वर्या बच्चन आणि नात आराध्या यांच्यावरही कोरोनाचे उपचार सुरू आहेत.