महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

गूढ पोस्टने चाहत्यांची काळजी वाढल्यानंतर अमिताभने केला खुलासा - अमिताभ यांचे आरोग्य

अमिताभ बच्चन यांच्या गुढ ट्विटमुळे चाहते त्यांच्या तब्येतीची चिंता करत होते. अमिताभ हे नियमित ब्लॉग लिहित असतात. याच ब्लॉगमधून त्यांनी आपल्या ट्विटचा खुलासा केला आहे. खरंतर त्यांनी वाटणारी चिंता त्यांनी यात व्यक्त केली आहे. त्यांच्या या स्पष्टीकरणामुळे चाहत्यांचा जीव भांड्यात पडला आहे.

अमिताभ बच्चन
अमिताभ बच्चन

By

Published : Feb 28, 2022, 4:48 PM IST

मुंबई- रविवारी अमिताभ बच्चन यांनी एक गूढ ट्विट शेअर केल्यानंतर बॉलीवूडचे आयकॉन बिग बी यांचे चाहते गोंधळले आणि चिंतित झाले. बिग बींनी त्यांच्या ब्लॉग पोस्टद्वारे त्यांच्या ट्विटमागील गूढ उकलले त्यानंतर चाहत्यांची जीव भांड्यात पडला.

रविवारी रात्री, बिग बी, "हृदय पंपिंग .. चिंतित .. आणि आशा ..." असे ट्विट शेअर केले होते. अमिताभ यांनी कारण न सांगितले नसल्याने या गूढ पोस्टने अनेकांना काळजीत टाकले. त्यांनी हे ट्विट शेअर केल्यानंतर लगेचच चाहत्यांनी गेट वेल सूनच्या मेसेजचा वर्षाव सुरू केला. एका युजरने लिहिले, "त्वरित बरे होण्यासाठी प्रार्थना," तर दुसर्‍याने लिहिले, "सर्व ठीक आहे. काळजी करण्यासारखे काही नाही. नीट आराम करा. नीट झोपा. रात्रीची वेळ आहे."

अमिताभ बच्चन हे एक उत्कट ब्लॉगर देखील आहेत. त्यांनी नंतर त्यांच्या शूटिंगच्या दिवसाबद्दल पोस्ट केले. त्यांचा ब्लॉग वाचून त्यांच्या आरोग्याबद्दल चिंतित असलेल्या चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. बिग बींनी त्यांच्या ब्लॉगद्वारे त्यांच्या ट्विटमागील गूढ उकलले.

बिग बींनी लिहिले : " लाईन्स शिकण्याचा ताण आणि योग्य परफॉर्मन्सची भीती किंवा किमान मान्य होईल अशी परीक्षा...पण खरी परीक्षा होती ती निर्जन मढ आयलँडवरुन परत जाण्याची...आता शहरापासून दूर जाणार नाही.. पण एकांत बेटापासून दूर जात आहे,.. आता एकांत नाही, शांत वारे, समुद्राची गाज, समुद्रकिनाऱ्यांवर फिरण्याचे स्वातंत्र्य, पक्ष्याशिवायची दृष्टी.. सर्व संपले.. आता बांधलेल्या वास्तू आणि इमारती.. आणि व्यापार.. संध्याकाळी 5:30 पर्यंत काम लवकर संपवले आणि 8:30 वाजता जलसा मध्ये पोहोचलो.. "असे त्यांनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले होते.

बिग बी सध्या सूरज बडजात्याच्या 'उंचाई' या चित्रपटात काम करत आहेत. त्यांच्याकडे प्रभास आणि दीपिका पदुकोणसोबत मेगा-बजेट 'प्रोजेक्ट के' आहे. अमिताभ यांचा आगामी झुंड हा चित्रपट रिलीजसाठी सज्ज आहे. बिग बी आगामी 'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकसाठी पदुकोणसोबत पुन्हा एकत्र येणार आहेत.

हेही वाचा -पांढऱ्या लेहेंग्यातील सुहाना खानने चाहत्यांसह आई गौरीचेही जिंकले मन

ABOUT THE AUTHOR

...view details