मुंबई- बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन अनेकदा चित्रपटांशिवाय रिअल लाईफमध्येही अनेकांसाठी मदतीचा हात पुढे करत आपण केवळ चित्रपटांतच नव्हे तर दैनंदिन जीवनातही खरे नायक असल्याचे दाखवून देत असतात. नुकतंच ओदिशाच्या किनारपट्टीवर धडकलेल्या चक्री वादळामुळे येथील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आता या नागरिकांसाठी अमिताभ यांनी मदतीचा हात पुढे केला आहे.
'हर चोट पर मरहम लगाएंगे हम', अमिताभनं केली फनी वादळग्रस्तांना मदत - big b
'चाहे जितना भी हो प्रचंड तूफ़ान, तूफ़ान से लड़ेंगे हम..न अकेले तुमको छोड़ा था, न अकेले कभी छोड़ेंगे हम...जो घर उजड़ गए, उन्हें फिर से बसायेंगे हम, हर चोट पर मरहम लगाएंगे हम', अशा या ओळी आहेत

अमिताभ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबद्दलची माहिती देत इतरांनाही फनी वादळग्रस्तांना मदत करण्याचं आवाहन केलं आहे. यासोबतच या सर्व परिस्थितीवर अमितभ यांनी काही खास कवितेच्या ओळीही पोस्ट केल्या आहेत. ज्या सर्वांची मनं जिंकणाऱ्या आहेत.
'चाहे जितना भी हो प्रचंड तूफ़ान, तूफ़ान से लड़ेंगे हम..न अकेले तुमको छोड़ा था, न अकेले कभी छोड़ेंगे हम...जो घर उजड़ गए, उन्हें फिर से बसायेंगे हम, हर चोट पर मरहम लगाएंगे हम', अशा या ओळी आहेत. गरजुंना मदत करण्याची अमिताभ यांची ही पहिली वेळ नाही. याआधीही त्यांनी वीरमरण आलेल्या जवानांच्या आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना अनेकदा मदत केली आहे.