मुंबई- राज्यात पावसामुळे जनजीवनावर झालेल्या परिणामानंतर त्याचे पडसाद विधानसभेतही उमटले होते. अमिताभ बच्चन, नवाब मलिक यांच्या घरात पाणी घुसले तर गरीबांच्या झोपड्याचे काय? असा प्रश्न विधानसभेत अजित पवारांनी उपस्थित केला होता. त्यानंतर आता अमिताब बच्चन यांनीही एक ट्वीट करत मुंबई महापालिकेची फिरकी घेतली आहे.
'भैया गोरेगाव लेना', बिग बींचा मुंबई पालिकेला टोला - टी ३ ‘जलसावरून..’
महानायक अमिताभ बच्चन यांनी मुंबईच्या पावसावर एक ट्वीट केले आहे.
बच्चन यांनी ट्वीटरवर त्यांच्या सिनेमातील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ते एका होडीत बसले आहेत, त्यांच्यासोबत झिनत अमानही आहेत. या फोटोला कॅप्शन देताना त्यांनी लिहिले की, ‘भैया गोरेगाव लेना'. तसेच त्यांनी या फोटोवर त्यांनी टी ३ ‘जलसावरून..’ असा मेसेजही लिहिला आहे.
मुसळधार पावसाने सर्वसामान्यांप्रमाणे सेलिब्रिटींनाही झोडपले आहे. सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. यामध्ये सर्वाधिक पाणी जुहूमध्ये साचले आहे. तर महानायक अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याबाहेर रस्त्यावर पाणी साचल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.