मुंबई- आयुष्मान खुराणा लवकरच बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. सुजित सरकार यांच्या आगामी चित्रपटात ही जोडी एकत्र झळकणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने आयुष्मान पहिल्यांदाच अमिताभ यांच्यासोबत काम करणार आहे.
पहिल्यांदाच एकत्र झळकणार आयुष्मान, अमिताभ; हे असेल चित्रपटाचे नाव - gulabo sitabo
या चित्रपटाच्या निमित्ताने आयुष्मान पहिल्यांदाच अमिताभ यांच्यासोबत काम करणार आहे. सुजित सरकार यांचं दिग्दर्शन असलेला हा चित्रपट फॅमिली कॉमेडी असणार आहे.
'गुलाबो सिताबो' असं या चित्रपटाचं शीर्षक असणार आहे. सुजित सरकार यांचं दिग्दर्शन असलेला हा चित्रपट फॅमिली कॉमेडी असणार आहे. जुही चतुर्वेदी यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे. तर रॉनी लहिरी आणि शील कुमार यांची निर्मिती असणार आहे.
नोव्हेंबर २०१९ ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अमिताभ आणि आयुष्मान या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र येणार असल्याने त्यांच्या चाहत्यांसाठी हा चित्रपट खास असणार आहे. अशात आता प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असणार हे नक्की.