मुंबई - बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या 'ब्रम्हास्त्र' हा चित्रपट खूप काळापासून चर्चेत आहे. या चित्रपटात बिग बींसोबत आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
या चित्रपटाबद्दल खूप उत्सुकता आहे. याची उत्कंठा अधिक वाढवत अमिताभनी हा फोटो शेअर केला आहे.
फोटोच्या कॅप्शनमध्ये अमिताभ यांनी लिहिलंय, ''माझ्या सर्वात आवडत्या रणबीर कपूरसोबत काम करताना. त्याच्यासारख्या विशाल टॅलेंटसोबत काम करताना माझ्यासारख्या ४ जणांची गरज आहे. अमिताभने शेअर केलेल्या या फोटोंचे चाहते कौतुक करीत आहे.''
अयान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रम्हास्त्र' हा चित्रपट तीन भागात बनत आहे. आतापर्यंत या चित्रपटाचा लोगो रिलीज करण्यात आलाय.
करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनची निर्मिती असलेला 'ब्रम्हास्त्र' हा चित्रपट ४ डिसेंबर २०२० ला रिलीज होणार आहे.