महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

अमिताभ बच्चनने शेअर केला फोटो, त्या 'कॅप्शन'ने जिंकली चाहत्यांची मने - अमिताभ बच्चनने शेअर केला फोटो, 'कॅप्शन'ने जिंकली चाहत्यांची मने

अमिताभ बच्चन यांनी आपल्या सोशल मीडियावरएक ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला आहे. फोटोला त्यांनी जे कॅप्शन दिलं आहे त्याने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

Amitabh Bachan
अमिताभ बच्चन

By

Published : Mar 11, 2020, 5:30 PM IST

मुंबई - बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. वेळोवेळी आपल्या प्रशंसकांसाठी आपल्या आयुष्याशी संबंधित गोष्टी शेअर करीत असतात. काही दिवसापूर्वीच त्यांनी कळवले होते, की आयन मुखर्जींच्या 'ब्रम्हास्त्र' चित्रपटाचे शूटींग त्यांनी पूर्ण केले आहे.

आता अमिताभ यांनी आपला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. याच्या कॅप्शनची सध्या खूप चर्चा आहे. व्हायरल झालेल्या या पोस्टमध्ये अमिताभ यांनी एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केलाय. त्याच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलंय, ''मिज़ाज में थोड़ी सख़्ती ज़रूरी है जनाब ; लोग पीकर ख़ाली कर देते अगर समंदर खारा ना होता !!'' ( स्वभावात थोडी कठोरता असणे आवश्यक आहे साहेब, समुद्र जर खारट नसता तर लोकांनी पिऊन संपवला असता.)

अमिताभ यांच्या पोस्टला त्यांचे चाहते खूप पसंत करीत आहेत. आतापर्यंत या पोस्टला दोन लाखाहून अधिक लोकांनी लाई केलंय आणि कॉमेंट्सचा वर्षाव सुरू आहे.

कामाच्या पातळीवर बोलायचे तर अमिताभ आगामी ४ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. 'चेहरे', 'ब्रह्मास्त्र', 'झुंड' आणि 'गुलाबो-सिताबो' हे बच्चन यांचे आगामी चित्रपट आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details