पटना- बिहारमध्ये आलेल्या महापूरानंतर प्रचंड जीवित आणि वित्तहानी राज्यात झाली आहे. पूरग्रस्तांना मदतीसाठी अनेक थरातून मदत होत आहे. महानायक अमिताभ बच्चन यांनी मुख्यमंत्री सहाय्य निधीसाठी ५१ लाख रुपयांची मदत केली आहे. आपले प्रतिनिधी विजय नाथ मिश्र यांच्या मार्फत हा निधी अमिताभ यांनी हा निधी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांना सुपुर्त केला.
बिहारच्या पूरग्रस्तांना अमिताभ यांनी केली ५१ लाखाची मदत - Bihar flood news
बिहार पुरग्रस्तांसाठी अमिताभ बच्चन यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ५१ लाखांचा चेक दिला आहे. उपमुख्यमंत्री सुशिल मोदी यांनी याचा स्वीकार करीत जनतेच्या वतीने बिग बी यांचे आभार मानले आहेत.
अमिताभ बच्चन
अमिताभ बच्चन यांनी या निधीसोबत मुख्यमंत्री नितीश कुमार यांना एक पत्रही लिहिले आहे. चेकचा स्वीकार केल्यानंतर सुशिल मोदी यांनी बिहारच्या जनतेच्यावतीने अमिताभ यांचे आभार मानले आहेत.
विशेष म्हणजे यापूर्वी अमिताभ यांनी बिहारच्या हजारो शेतकऱ्यांचे कर्ज स्वतः भरले होते.