मुंबई - व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने 'लाल सिंग चढ्ढा'चे नवे पोस्टर रिलीज करण्यात आलंय. आमिर खानने आपल्या सोशल मीडियावर पोस्टर पोस्ट करीत लिहिलंय, की प्रत्येक सिनेमात करिनासोबत रोमान्स करण्यास मिळावा.
पोस्टरमध्ये पगडी घातलेला आमिर पाठमोरा दिसत असून त्याच्या गळ्यात करिनाने आपले हातांची मिठी घातली आहे.
पा लेने की बेचैनी, और खो देने का डर
बस इतना सा है, जिंदगी का सफर
असे आमिरने ट्विटमध्ये लिहिलंय. पुढे त्याने करिनाला व्हॅलेंटाईनच्या शुभेच्छा देत प्रत्येक सिनेमात रोमान्स करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
आमिर खान 'ठग्ज ऑफ हिंदुस्थान'मध्ये शेवटचा दिसला होता. आता त्याची पुन्हा तिसऱ्यांदा करिनासोबत लाल सिंग चढ्ढामध्ये ऑन स्क्रिन जोडी पाहायला मिळणार आहे.
यापूर्वी करिना आणि आमिर खानने 'थ्री इडियट' आणि 'तलाश' या चित्रपटात एकत्र काम केले होते.
'लाल सिंग चढ्ढा' हा चित्रपट २५ डिसेंबर २०२० ला ख्रिसमसला रिलीज होणार आहे.