नवी दिल्ली - बॉलीवूड सुपरस्टार आमिर खानने रविवारी सांगितले की तो द काश्मीर फाइल्स पाहणार आहे. कारण हा चित्रपट भारतीय इतिहासाचा एक भाग आहे जो सर्वांच्या हृदयांना भिडतो. आमिर खान राजधानी दिल्लीत राजधानीत एसएस राजामौली यांच्या आरआरआर चित्रपटाच्या चाहत्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होता.
"जो काश्मीर में हुआ काश्मिरी पंडितों के साथ वो यकीनन बहुत दुःख की बात है," असे आमिरने नमूद केले. "ऐसी एक फिल्म जो बनी है जो उस टॉपिक में वो यकीनन हर हिंदुस्थानी को देखना चाहिए," असे तो पुढे म्हणाला.
"या चित्रपटाने मानवतेवर विश्वास ठेवणार्या सर्व लोकांच्या भावनांना स्पर्श केला आहे आणि हेच त्याबद्दल खूप सुंदर आहे," असे आमिर म्हणाला. ''मी चित्रपट नक्कीच पाहीन आणि चित्रपट यशस्वी झाल्याचे पाहून मला आनंद होत आहे,'' असेही तो पुढे म्हणाला.
विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित आणि अनुपम खेर, दर्शन कुमार, मिथुन चक्रवर्ती आणि पल्लवी जोशी अभिनीत 'द काश्मीर फाईल्स', 11 मार्च रोजी रिलीज झाल्यापासून एकामागून एक बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक करीत आहे.
हेही वाचा -अक्षय कुमारच्या 'बच्चन पांडे'चा बॉक्स ऑफिसवर दणका, पहिल्याच दिवशी केली १३ कोटींची कमाई